मुंबई : हवामानात बदल झाला की आपल्या शरीरातही बदल होण्यास सुरुवात होत असते. थंडीमध्ये सर्दी आणि अॅलर्जीसारख्या गोष्टी सहज होतात. अशा वेळेत निष्काळजी राहिल्यास त्याचा परिणाम भविष्यात पहायला मिळतो.
१. थंडीट या गोष्टी करु नका :
कमी पाणी पिणे : उन्हाळ्यात जेवढी तहान लागते तेवढी तहान थंडीमध्ये लागत नाही. पण शरिराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी कमीत कमी 2 लीटर पाणी पिणे आवश्यक असते. शरिरात पाणी कमी असल्यास डिहायड्रेशनमुळे किडनी, आणि अपचन सारखे विकार होऊ शकतात.
२. जास्त कपडे घालणे : थंडीत आपण थंडीपासून बचाव व्हावा यासाठी जास्त कपडे घालतो. पण असं केल्याने घाम येतो आणि घाम सुकल्यानंतर अधिक थंडी वाजते.
३. हात आणि पाय झाकणे : हातमोजे आणि पायमोजे घालून अनेक लोक त्यांना गरम ठेवण्याचा प्रयत्न करतात पण हा उपाय योग्य नाही. हात आणि पाय हे असे दोन अवयव आहेत जे आपल्याला हवामानाच्या अनुकूल राहण्यास मदत करतात.
४. आरामात झोपणे : थंडीच्या दिवसांमध्ये वजनवर अधिक लक्ष देण्याची गरज असते. थंडीमध्ये आपण जंक फूड अधिक खातो आणि काम कमी करतो. त्यामुळे वजन वाढतं. थंडीच्या दिवसांमध्ये फळ आणि हिरव्या भाज्या अधिक खाल्या पाहिजे.
५. अधिक क्रिम आणि लोशन लावणे : थंडीमध्ये त्वचेच्या सुरक्षेसाठी अनेक लोक वेगवेगळ्या क्रिम आणि लोशन लावतात. पण हे अधिक प्रमाणात लावल्यानं स्किन अॅलर्जीचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते.