लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे जमा होणार? याची अपडेट समोर आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 6, 2025, 08:18 AM IST
लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट  title=
when will Ladki Bahin Yojana 2100 rs Installment gest check new Update

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेवरुन सध्या राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीनं लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी करण्यास सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गंत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने यात वाढ करुन ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र ही रक्कम खात्यात कधी येणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. डिसेंबरमध्ये महिलांना 1500 रुपयांचा हफ्ता मिळाला होता. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. तर जानेवारीचा हफ्तादेखील संक्रातीआधी देणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र हा हफ्ता 1500 रुपयेच असल्याचं समोर येत आहे. तर 2100 रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटलांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

लाडकी बहिण योजनेबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असताना विखे पाटलांचे मोठे वक्तव्य केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. मात्र मार्चनंतर  लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 हून 2100 होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.  म्हणजे मार्च पासून लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपयांच्या वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे.

अर्जांची छाननी होणार?

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करायला सुरुवात केलीय. यात अपात्र आणि एकावेळी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. तसंच, महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांनी खोटी माहिती भरून अर्ज केलेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.