हैदराबाद : प्राण्यांवर प्रेम करा असा संदेश देणाऱ्या 'पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा)च्या म्हणण्यानुसार, धुम्रपानाप्रमाणेस मांस खाणाऱ्या व्यक्तींना हृदयसंबंधीत विकार आणि कँसरचा धोका जास्त असल्याचं म्हटलंय.
लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या संघटनेनं इथं पोस्टर लावलंय.... ज्यामध्ये एक मुलगा सिगारेट पिताना दाखवला आहे. 'तुम्ही आपल्या मुलांना कधीही सिगारेट पिताना पाहू इच्छिणार नाही आणि धुम्रपानाप्रमाणेच मांस खाण्यामुळेही हृदयसंबंधीत विकार आणि कँसरचा धोका वाढतो... शाकाहारी बना!' असं या फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय.
हैदराबादच्या रहिवाश्यांच्या जीवनशैलीमुळे कँसर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं 'पेटा'नं म्हटलंय. त्यामुळेच, आपल्या नव्या 'जीवन रक्षक अभियाना'साठी हे शहर पेटासाठी अनुकूल ठरलंय.
४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्तानं इथं या संस्थेच्यावतीन लोकांना मांस आणि डेअरी उत्पादनांना सोडण्याचा आग्रह करण्यात आला.
'पेटा इंडिया'च्या पदाधिकारी भुवनेश्वीर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या मुलांसाठी एक चांगलं उदाहरण प्रस्थापित करणं किती गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच, शाकाहारी बनण्यासारख्या चांगल्या सवयींची निवड करणं त्यांना स्वस्थ जीवनाकडे मार्गदर्शन करेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.