लहान मुलाच्या डोक्यामागे चापट मारणे असते धोकादायक, कारण...

तुमच्या घरात लहान मूल आहे. ते खूप दंगेखोर किंवा मस्ती करणारे असेल तर तुम्ही हैराण होता. तुमचा राग वाढतो. मात्र, या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्ही रागाच्या भरात मुलाच्या डोक्याच्या पाठीमागे थप्पड किंवा चापट मारता. तुमचा उद्देश असतो मूल सुधारावे. पण ही थप्पड मारण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण अशी थप्पड मारणे मुलासाठी ती धोकादायक असते. यामुळे लहान मुलाचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.

Updated: Jun 25, 2016, 11:50 AM IST
लहान मुलाच्या डोक्यामागे चापट मारणे असते धोकादायक, कारण... title=

मुंबई : तुमच्या घरात लहान मूल आहे. ते खूप दंगेखोर किंवा मस्ती करणारे असेल तर तुम्ही हैराण होता. तुमचा राग वाढतो. मात्र, या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर तुम्ही रागाच्या भरात मुलाच्या डोक्याच्या पाठीमागे थप्पड किंवा चापट मारता. तुमचा उद्देश असतो मूल सुधारावे. पण ही थप्पड मारण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण अशी थप्पड मारणे मुलासाठी ती धोकादायक असते. यामुळे लहान मुलाचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.

५० वर्षांच्या संशोधनातूनही बाब पुढे आलेय की,  लहान मुलांच्या डोक्याच्या पाठिमागे हलकी थप्पड मारणे त्रासदायक ठरते. लहान मुलाला मानसिक समस्या निर्माण होऊ शकते. तसेच तीव्र मानसिक क्षमता (कॉग्नेटिव्ह एबिलिटी) होण्याचा धोका वाढतो. जवळपास १,६०,००० मुलांचा अभ्यास करण्यात आला.

संशोधकांनी मानसिक समस्या असणाऱ्या मुलांचा आणि मानसिक आरोग्य समस्या उद्धभवण्याची शक्यता असलेल्या दरम्यानमधील मुलांमध्ये सकारात्मक संबंध विकसित झाल्याचे संशोधकांनी अभ्यासाअंती आपले मत व्यक्त केले. ऑस्टिन येथील यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधील अभ्यास करणाऱ्या लेखिका एलिझाबेथ जेरशॉफच्या मते, संशोधनात समजेल की, लहान मुलांच्या डोक्याच्या पाठिमागे चापटी मारणे खूप धोकादायक असते. जर मुलाला असे मारले तर मूल सुधारेल तर ती बाब चुकीची आहे. कारण असे कृत्य मुलाबाबत तुमचे नाते संबंध बिघडवू शकतात. हे संशोधन 'जर्नल ऑफ फॅमिली सायकॉलॉजी' प्रकाशित झाले आहे.