मुंबई : आपल्याला सर्वांना माहीत आहेच की आले शरीरासाठी चांगले असते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेत शरीराला आवश्यक व्हिटामिन्स असतात. आल्याच्या रसाचे नियमितपणे सेवन तुमच्या शरीरासाठी लाभदायक ठरु शकते.
१. आल्याच्या रसामुळे डायबेटिज कंट्रोल होण्यास मदत होते. यातील अँटी डायबेटिक गुणधर्मामुळे डायबेटिज नियंत्रित राहतो.
२. पचनाचा त्रास असल्यास त्यावर आल्याचा रस उत्तम. आल्याच्या रसाने पचन नीट होते.
३. कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यासाठी आल्याचा रस घेणे फायदेशीर.
४. आल्याच्या रसाच्या सेवनाने मुरुमे कमी होतात.
५. कफाचा त्रास असल्यास त्यावरही आल्याचा रस उत्तम. पावसात सर्दी-खोकल्याचा त्रास अधिक होतो. त्यामुळे पावसात आल्याचा रस नियमितपणे घेतल्यास सर्दी-खोकल्यापासून बचाव होऊ शकतो.