तुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!

धूम्रपान केल्याने महिलांना वंधत्वाचा धोका जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. धूम्रपानचे व्यसन जडलेल्या महिला तंबाखू सेवन करीत असतील तर वंधत्व आणि रजोनिवृत्तीच्या शिकार होऊ शकतात. संशोधकांनी एक गंभीर इशारा दिलाय, अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारे धूम्रपानामुळे महिलांना वंधत्व आणि वेळेच्या आधी रजोनिवृतीचा धोका वाढतो.

Updated: Dec 18, 2015, 05:21 PM IST
तुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!  title=

नवी दिल्ली : धूम्रपान केल्याने महिलांना वंधत्वाचा धोका जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. धूम्रपानचे व्यसन जडलेल्या महिला तंबाखू सेवन करीत असतील तर वंधत्व आणि रजोनिवृत्तीच्या शिकार होऊ शकतात. संशोधकांनी एक गंभीर इशारा दिलाय, अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारे धूम्रपानामुळे महिलांना वंधत्व आणि वेळेच्या आधी रजोनिवृतीचा धोका वाढतो.

संशोधकांच्या मते तंबाखू शरीरात गेल्याने रजोनिवृत्ती एक किंवा दोन वर्षांच्या आधी होऊ शकते. ज्या महिला धूम्रपान करत नाहीत त्यांना पॅसिव्ह स्मोकिंगच्या माध्यमातून याचा सामना करावा लागू शकतो. न्यूयॉर्कच्या रोजवेल पार्क कॅन्सर इन्स्टीट्यूटने केलेल्या एका सर्व्हेनुसार ही बाब स्पष्ट झाली आहे. धूम्रपान अॅक्टिव्ह किंवा पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारामुळे महिलांना वंधत्व आणि रजोवृत्तीचा धोका असतो.

धूम्रपान केल्याने शरीरात तंबाखू गेल्याने महिलांच्या प्रजननावर मोठा प्रभाव पडतो. प्रजनन तंत्राचे हार्मोनल संतुलन बिघडते. वर्ल्ड हेल्थ इनिशिएटिव्ह ऑब्जर्व्हेशन स्टडी (WHIOS)ने ९३,००० महिलांचा अभ्यास केला. त्यातून हीबाब स्पष्ट झाली. त्यांच्या प्रजनन तंत्रावर परिणाम झाल्याने त्या गर्भवती होण्याबाबत समस्या निर्माण झाली.