नवी दिल्ली : उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी खाणे-पिणे जितके महत्वाचे आहे. तितकेच शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करणार असाल तर तुम्हाचे तन आणि मन दोन्ही आनंदी राहते. शरीरसोबत तुम्हाचा मेंदूसुद्धा स्वस्थ राहतो.
व्यायामाने आपल्या मेंदूचे टॅम्पॉरल लॉब नावाच्या भागातील कार्यक्षमता जलदगतीने होते. ते आपल्या भावनिक आठवणी जमा करण्यासाठी कारणीभूत आहे. त्या व्यतिरिक्त काही नवी शिकणे आणि प्रदर्शन करण्याची क्षमता वाढते.
जास्त अभ्यास केल्यामुळे मनुष्याला विसरण्याचा आजार–डिमेंशिया, अल्जायमर यांच्या पासून सुटका होईल. या व्यतिरिक्त व्यायामामुळे मास्टर ग्लॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीयूष ग्रंथी या पिट्यूटरी ग्लॅन्ड जास्त अंडोर्फिन हार्मोन स्रावित करतात. ज्यामुळे प्रतिबंधक दुखण्यावर रामबाण उपाय आहे. तणाव, उदासीनता आणि उत्तेजना यांच्या प्रति संवेदनशील होण्याचा धोका कमी होतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.