www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत... काही तरी थंड थंड खावं असं सारखं वाटत राहतं... मग, अशा वेळी आपण कोल्ड्रिंक आणि तत्सम पदार्थांचा आसरा घेतो. पण, याऐवजी फळ खाल्ली तर ती नक्कीच आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. यापैंकीच एक म्हणजे द्राक्ष...
थोडे आंबट थोडे गोड चव असणारे द्राक्ष चोखून चोखून खाण्याची मजा काही औरच! याच द्राक्षांमुळे आपण अनेक आजारांना आपण पळवून लावू शकतो. तसेच अनेक प्रकरांचे आजार होण्यापासूनही द्राक्षातील घटक आपल्याला मदत करतात.
द्राक्षांमध्ये प्रोटीन्स, पोट्यशिअम, फॉस्फोरस, कार्बोहायर्डेट, तसेच ग्लुकोजचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्यांना द्राक्ष खाल्याने याचा खुप फायदा होतो. तसेच थकवा जाणवत असेल तर द्राक्ष खाण्याने थकवाही पळून जाऊन ताजेतवाने वाटते.
आपल्या शरीरातील काही अनावश्यक द्रव्य शरीरातून बाहेर काढण्यासाठी द्राक्षातील साखर खुपच उपयुक्त ठरते. रक्तातील क्षारांचे संतुलन राखण्यासाठीही द्राक्ष खाणे अतिशय उत्तम असते. शरीरातील आम्ल वाढल्यासही द्राक्ष खाल्ल्याने ते कमी होते.
रोज द्राक्ष खाल्याने अपेडिंक्स, भोवळ येणे, रक्ताचे काही विकार, आणि थकवा हे विकार होणे टाळता येऊ शकतात.मानसिक तणावाखाली असलेल्यांनी तर द्राक्षाचे सेवन करावेच यामुळे त्यांना तणावातून मुक्तता मिळू शकते. पचन सुधारण्यासही द्राक्ष सहाय्यकारी ठरतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.