शरीरात रक्ताची कमतरता असल्यास खा चणाडाळ

चणे खाण्याचे फायदे तुम्ही जाणताच मात्र चण्याची डाळ खाण्यानेही शरीराला अनेक फायदे होतात. चण्याची डाळ खाल्ल्याने पोटदुखी, गॅससारख्या समस्या होतील यामुळे अनेक जण खात नाहीत. मात्र चण्याची डाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे.

Updated: Oct 2, 2016, 01:55 PM IST
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास खा चणाडाळ title=

मुंबई : चणे खाण्याचे फायदे तुम्ही जाणताच मात्र चण्याची डाळ खाण्यानेही शरीराला अनेक फायदे होतात. चण्याची डाळ खाल्ल्याने पोटदुखी, गॅससारख्या समस्या होतील यामुळे अनेक जण खात नाहीत. मात्र चण्याची डाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे.

चण्याच्या डाळीमध्ये आर्यन मोठ्या प्रमाणात असते. ही डाळ खाल्ल्याने शरीरातील आर्यनची कमतरता भरुन निघते. तसेच हिमोग्लोबीनचा स्तर वाढण्यास मदत होते.

ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी चण्याची डाळ खावी. 

मोठ्या प्रमाणात फायबर्स असेलली चणाडाळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. 

चणाडाळमध्ये झिंक, कॅल्शियम, प्रोटीन सारखी पोषकतत्वे असतात. यामुळे शरीराला आवश्यक एनर्जी मिळते.