रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिणे गरजेचे

सकाळच्या तुलनेत रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिण्याने शरीरास अनेक फायदे होतात. खासकरुन पुरुषांना याचे फायदे अधिक होतात. 

Updated: Jan 14, 2017, 11:51 AM IST
रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिणे गरजेचे  title=

मुंबई : सकाळच्या तुलनेत रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिण्याने शरीरास अनेक फायदे होतात. खासकरुन पुरुषांना याचे फायदे अधिक होतात. 

हे आहेत फायदे

१. दुधामध्ये Tryptophan असते ज्यामुळे शरीर रिलॅक्स होते. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्यास झोप चांगली लागते. 

२. रात्री दूध प्यायल्यास पचनशक्ती वाढते. यामुळे जलदगतीने फॅट बर्न होते

३. दुधातील फॅट आणि प्रोटीन्स पुरुषांमधील हार्मोन्स अॅक्टिव्ह करतात. 

४. दुधामध्ये कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम असल्याने बॉडीला एनर्जी मिळते. 

५. दुधामध्ये सेसिन आणि व्हे प्रोटीन असते ज्यामुळे मसल्स मजबूत बनतात. 

६. एक ग्लास दुधात पुरुषांना आवश्यक ३७ टक्के कॅल्शियम असते. यामुळे हाडे मजबूत होतात.