मुंबई : जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी लसणाचा वापर आहारात प्रामुख्याने करतात. मात्र लसूण केवळ स्वाद वाढवण्याचे कामच करत नाही तर त्यात अनेक औषधी गुण आहेत. नियमितपणे लसूण खाल्ल्याने ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. अॅसिडीटीच्या समस्येवर लसूण गुणकारी आहे. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात.
जाणून घ्या हे फायदे
हाय ब्लडप्रेशरचा तुम्हाला त्रास असेल तर त्यावर लसूण उत्तम. लसूण विविध हृद्यसंबंधी आजारांवर गुणकारी आहे.
पोटाच्या समस्या तसेच डायरियावर गुणकारी आहे लसूण. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
पाचनशक्ती वाढवण्यासाठी तसेच भूक वाढवण्यासाठी लसणीचा वापर होतो.
ट्युबरक्युलॉसिसची समस्या असल्यास सकाळी रिकाम्या पोटी लसूण खावा.
लसूण अँटिबायोटिकचे काम करते.
दातदुखीचा त्रास असेल लसणीचे सेवन फायदेशीर ठरते. दातांमध्ये दुखणे सुरु झाल्यास लसणीचा तुकडा गरम करुन दुखत असलेल्या दाताखाली ठेवा.