ऑफिसमध्ये काम करताना काहीतरी अरबट-चरबट तोंडात टाकण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते... पण, आता आम्ही तुम्हाला सांगतोय अशा काही गोष्टी ज्यामुळे ही सवयही तुम्हाला हेल्दी ठेऊ शकते.
जवळ ड्रायफ्रुटस् बाळगा...
काम करताना भूक लागली की बटाट्याचे वेफर्स किंवा मिळेल ते पदार्थ आपण काम करताना तोंडात टाकतो... पण, अशावेळी तुमच्याकडे ड्राय फ्रुटस असतील तर उत्तमच... न्युट्रिशनसाठी ड्राय फ्रुट्स हे उत्तम पर्याय आहे. तुम्ही हे सकाळी जाताना पर्समध्ये घेऊन जाऊ शकतात. तसेच कामात असताना भूक लागल्यास खाऊ पण शकतात. फळे खाल्ल्याने तुम्ही तंदुरूस्त राहण्यास मदत होईल.
भिजवलेली कडधान्य
ऑफिसमध्ये जर तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर कडधान्ये खाणे केव्हाही उत्तम... कडधान्यात प्रोटिन, व्हिटॅमिन, अॅन्टी ऑक्सिडट्स आणि अमिनो अॅसिड असते. कडधान्ये खाल्ल्याने शरिरात ताकद येण्यास मदत होते. कडधान्यांमुळे फास्टफुड खाण्याची इच्छा कमी होते. यासाठी चने, हिरवे मूग आणि सोया एकत्र रात्री भिजत टाका. दुसऱ्या दिवशी जेव्हा मोड येईल त्यावेळी त्यावर कांदा, टोमॅटो आणि जिरे बारीक करून टाकल्यास चविष्ट होतात.
घरीच बनवा पॉपकॉर्न
बऱ्याच जणांना पॉपकॉर्न आवडतात. पण जाडी वाढेल यासाठी बरेच जणं हे खाणे टाळतात. आम्ही तुम्हाला पॉपकॉर्न खाण्याचा सल्ला देत आहोत. पॉपकॉर्न हे हेल्दी डायेट आहे. जर तुम्ही पॉपकॉर्नला बटर अथवा तेल न लावता खाल्ले तर ते तुमच्या शरिरासाठी हानिकारक नाही.
एकाच जागेवर बसून काम करणं टाळा
कामाचा ताण बराच असल्याने बरेच जण खाण्याकडे दुर्लक्ष करत असतात. काही जणाचे काम हे बसल्याजागी असल्यानं सकाळी एकदा बसल्यानंतर सध्याकाळपर्यंत खुर्चीतून उठत देखील नाही. तुमचे काम जरी पुर्ण होत असेल तरी पण एका जागेवर सतत बसणे आरोग्यासाठी हनिकारक ठरते. या तुमच्या सततच्या बसण्याने तुम्हाला मानेचा त्रास,पाठीचा त्रास या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ऑफिसमध्ये हेल्दी फुड सोबतच थोड्याफार प्रमाणात स्ट्रेचनिंग देखील केले पाहिजे. यासाठी दर दोन तासांनी तुम्ही तुमच्या कामाच्या खुर्चीवरून उठले पाहिजे आणि एक चक्कर मारली पाहिजे. हे केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.