आपला रंग उजळण्यासाठी हे खा!

शरीराच्या सौंदर्या पेक्षा मनाचं सौंदर्य पाहावं, असं म्हणतात. पण प्रत्येकाला आपला रंग गोरा असावा असं वाटत राहतं आणि गोरं होण्यासाठी अनेक उपाय, बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रिम्स वापरल्या जातात. पण आपल्या आहारावरही रंग अवलंबून आहे. योग्य आहारानं रंग उजळतो. पाहा आपला रंग उजळण्यासाठी काय खावं.

Updated: Sep 30, 2015, 09:57 AM IST
आपला रंग उजळण्यासाठी हे खा!  title=

मुंबई: शरीराच्या सौंदर्या पेक्षा मनाचं सौंदर्य पाहावं, असं म्हणतात. पण प्रत्येकाला आपला रंग गोरा असावा असं वाटत राहतं आणि गोरं होण्यासाठी अनेक उपाय, बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रिम्स वापरल्या जातात. पण आपल्या आहारावरही रंग अवलंबून आहे. योग्य आहारानं रंग उजळतो. पाहा आपला रंग उजळण्यासाठी काय खावं.

आणखी वाचा - एका रात्रीत दूर करा तुमची 'पिंपल्स'ची समस्या!

1. पपई - पपईमध्ये असलेलं कॅरोटिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतं. डोळ्यांचं तेज वाढविण्यासाठी पपई खावी. जे लोक नियमित पपई खातात, त्यांना कँसर होण्याची भीती कमी असते. पपई कॅल्शियम पण असतं, त्यामुळं शरीराची हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. काही परिस्थितीत मात्र पपई खावू नये. उदाहरणार्थ गर्भवती महिलांनी पपई खावू नये. 

पपईमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच व्हिटॅमिन ए, ई आणि अँटीऑक्सिडंट पण असतात. त्यामुळं त्वचेवरील डाग दूर होतात आणि पोटाचे आजारही पपई दूर करते. 

2. ब्रोकली - ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई अधिक प्रमाणात असतं. तसंच अँटीऑक्सिडंट पण असतात. त्वचेचा रंग उजळण्यासाठी ते मदत करते. 

3. गाजर - गाजर खाणं अतिशय फायद्याचं आहे. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी, कॅल्शियम आणि पॅक्टिन फायबर असतात. हे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू देत नाही. गाजरात व्हिटॅमिन सी आणि कॅरोटिनही असतं. त्यामुळं त्वचा आणि केसांसाठी हे बेस्ट आहे. सुंदर त्वचा मिळविण्यासाठी दररोज गाजरचा ज्यूस प्यावा. 

4. सोयाबीन - सोयाबीनच्या प्रत्येक उत्पादनाता व्हिटॅमिन सी आणि जस्त (झिंक) असतं. सोयापासून बनलेले पदार्थ खाल्ल्यानं पुरळ आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. आपण आपल्या डायटमध्ये सोयाबीनचा समावेश करून आपली डल स्कीन चमकदार बनवू शकता.

5. कीवी - कीवीमध्ये व्हिटॅमिन ए, बी12, आयरन, फायबरसोबत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. कीवी दररोज खाल्लायनं चेहऱ्याचा रंग बदलायला लागतो. स्किन हेल्दी होते. जर चेहऱ्यावर डाग असतील तर त्यावर कीवी बारीक करून लावल्यास डाग जातात.

6. बीट - बीटमध्ये व्हिटॅमिन, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरीन, आयोडिन, आयरन इत्यादी सत्व असतात. याच्या सेवनानं त्वचेचे छिद्र खुले होतात आणि ब्लड सर्कुलेशन वाढतं. रंग उजळायला लागतो. त्वचेच्या समस्यांपासून वाचण्यासाठी बीटचा रस दररोज प्यावा आणि याचा फेस पॅकही लावावा.

7. पालक - 100 ग्राम पालकातून 26 किलो कॅलरी ऊर्जा, 2% प्रोटीन, 2.9% कार्बोहार्डेट, 92% आर्द्रता, 0 .7 % चरबी, 0 .6 % फायबर, 0 .7 % खनिज असतं. पालकात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, बी, सी इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पाल खाल्ल्यानं त्वचा अधिक खुलते. 

8. स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरीत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. म्हणून त्याच्या नियमित सेवनानं वाढत्या वयाचा त्वचेवरील प्रभाव कमी होऊ शकतो. त्यात व्हिटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात असतात. स्ट्रॉबेरी दररोज खाल्ल्यानं चेहऱ्याचा रंग गुलाबी होतो.

9. हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन, पोषक तत्व आणि मिनरल्स खूप असतात. त्यामुळं त्वचा उजळते. 

10. शिमला मिर्ची - आधुनिक शोधांनुसार शिमला मिर्चीत बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि जिएक्सेन्थिन आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वपूर्ण रसायन असतात. शिमला मिर्ची खाल्लायनं शरीर बीटा कॅरोटीनचं रेटिनॉलमध्ये रुपांतर करतं. रेटिनॉल खरं तर व्हिटॅमिन 'ए'चं रुप आहे. या सर्व रसायनांच्या मदतीनं हृदयाशी संबंधीत आजार, ऑस्टियोपोरोसिस, आर्थरायटिस, ब्रॉकायटिस, अस्थमा सारख्या समस्यांमध्ये फायदा मिळतो. यामुळं त्वचेचा रंगही उजळतो. 

11. टोमॅटो - टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन तत्व असतात. कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं. याशिवाय टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोमध्ये लायकोपिन असतं. लायकोपिन स्किनसाठी उत्तम असतं. दररोज टोमॅटो खाल्ल्यानं वजन कमी होतं आणि कँसरपासून बचाव होतो.

12. ग्रीन टी - ग्रीन टी केमेलिया सायनेन्सिस नावाच्या झाडापासून बनवली जाते. याला कमी किण्वन पासून तयार केलं जातं. म्हणून हा चहा शरीरासाठी फायदेशीर ठरतो. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हे सनबर्नला ठीक करतं. त्वचेवरील डाग दूर करत त्वचा कोमल आणि हेल्दी बनवते. 

आणखी वाचा -  तुमचा कोमल चेहरा या पद्धतींनी अजिबात साफ करू नका...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.