मुंबई : उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे.
उन्हापासून बचावासाठी या आहेत टिप्स
उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते यामुळे भरपूर पाणी प्या.
अल्कोहोल अथवा कॉफी घेणे टाळा.
उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने दिवसातून दोन वेळा आंघोळ करा. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
उन्हातून बाहेर पडणे शक्यतो टाळा.
पुरेशी झोप घ्या.
उन्हाळ्यात सुती आणि सौम्य रंगाचे कपडे वापरा.