ह्युस्टन : पालकांसाठी आपल्या मुलांची काळजी घेण्यास मदत करणारी एक बातमी आहे. जर मुलांचे बालपण कौटुंबिक ताण-तणावातून जात असेल तर अठरा वर्षे वय होईपर्यंत मुलांना लठ्ठपणा येऊ शकतो. एका अभ्यासाद्वारे संशोधकांनी हा इशारा दिला आहे.
ह्युस्टन विद्यापीठातील संशोधकांच्या माहितीनुसार तीन विषेश प्रकारचे तणाव दिर्घ काळापर्यंत राहणे आणि मुलांना अठरा वर्षांपर्यंत लठ्ठपणा येणे यामध्ये संबंध असल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकेमध्ये नॅशनल लोंगिट्यूडनल स्टडी ऑफ यूथच्या आकडेवारीच्या साहाय्याने सहाय्यक प्रोफेसर डाफनी हर्नांडिस यांनी कौटुंबिक भांडण, आर्थिक दबाव आणि आईंचे स्वास्थ याचा अभ्यास केला गेला. तसेच ४७००पेक्षा अधिक युवकांचे परीक्षण केले. या अभ्यासाठी १९७५ ते १९९० मध्ये जन्मलेल्या मुलांचा समावेश आहे. या अभ्यासातून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
डाफनी यांनी सांगितले की, कौटुंबिक तणाव, आर्थिक दबाव यांची जाणीव मुलांना वारंवार होणे, आणि मुलांना अठरा वर्षांचे होईपर्यंत लठ्ठपणा येणे, यामध्ये परस्पर संबध आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.