'पिरियडस् लक्झरी नाहीत... मग टॅक्स का?'

देशातील अनेक भागांत आजही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स घेणं परवडत नाहीत... हाच मुद्दा 'शी सेज' नावाच्या एका ग्रुपनं एका व्हिडिओद्वारे मांडलाय. 

Updated: Apr 20, 2017, 05:29 PM IST
'पिरियडस् लक्झरी नाहीत... मग टॅक्स का?' title=

मुंबई : देशातील अनेक भागांत आजही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स घेणं परवडत नाहीत... हाच मुद्दा 'शी सेज' नावाच्या एका ग्रुपनं एका व्हिडिओद्वारे मांडलाय. 

#LahuKaLagaan या हॅशटॅगसहीत या ग्रुपनं महिलांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवर लावण्यात येणारा टॅक्स काढून टाकण्याची मागणी केलीय. 'पिरियडस् हे काही लक्झरी नाहीत... मग यावर टॅक्स का भरावा?' असं म्हणत त्यांनी आपलं म्हणणं अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलाय.  

'गर्लियापा'नं 'शी सेज'सोबत मिळून हा व्हिडिओ बनवलाय. सध्या सोशल मीडियावर हा व्हायरल होतोय. अभिनेत्री अदिती राव हैदरीनंही एका ट्विटद्वारे या कॅम्पेनला आपला पाठिंबा दर्शवलाय. 'सॅनिटरी नॅपकिन्स लग्जरी नाही तर गरज आहे. ते इतके स्वस्त असायला हवेत की जास्तीत जास्त महिलांना ते परवडू शकतील' असं तिनं आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय.