स्ट्रेच मार्क्स दूर ठेवण्यासाठी खास उपाय

आपल्याला उत्तम आणि स्वच्छ त्वचा हवीय? जर हो तर मग आपण पौष्टिक आहार करा आणि स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा. 

Updated: Aug 4, 2015, 10:14 AM IST
स्ट्रेच मार्क्स दूर ठेवण्यासाठी खास उपाय title=

मुंबई: आपल्याला उत्तम आणि स्वच्छ त्वचा हवीय? जर हो तर मग आपण पौष्टिक आहार करा आणि स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा. 

स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी एका दिवसात आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. असं केल्यानं स्कीनवरील स्ट्रेच मार्क्स हळुहळू दूर होतात. हेल्दी स्कीनसाठी व्हिटॅमिन सी आणि ई, झिंक, सिलिका आणि इतर पोषक तत्वांनी परिपूर्ण संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे. 

जेवणात स्ट्रॉबेरी, जांभूळ, पालक, गाजर, हिरव्या बिन्स, बदाम यांचा समावेश असावा.

लिंबाचा रस नैसर्गिक आम्ल आहे, जे स्ट्रेच मार्क्स दूर करतो. त्वचेवरील स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी लिंबाचा रस लावून 10 मिनीटं ठेवावा आणि नंतर धुवून टाकावे. जुने स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी लोशन आणि क्रीम बेस्ट ऑप्शन आहे. रेटीनोइक आम्ल असलेलं क्रीम नव्या स्ट्रेच मार्क्ससाठी चांगले राहतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.