पुरुषांमधील लठ्ठपणा कमी करतो 'LOVE हार्मोन'

लव्ह हार्मोन नावानं प्रसिद्ध असलेलं 'ऑक्सिटोसिन' हार्मोनचा परिणाम मेटॅबॉलिझमवर पडतो? हो हे खरं आहे. एका अहवालानुसार हे माहिती झालंय की यामुळं पुरुषांमधील लठ्ठपणा दूर करण्यास मदत होते.

Updated: May 16, 2015, 05:23 PM IST
पुरुषांमधील लठ्ठपणा कमी करतो 'LOVE हार्मोन' title=

न्यूयॉर्क: लव्ह हार्मोन नावानं प्रसिद्ध असलेलं 'ऑक्सिटोसिन' हार्मोनचा परिणाम मेटॅबॉलिझमवर पडतो? हो हे खरं आहे. एका अहवालानुसार हे माहिती झालंय की यामुळं पुरुषांमधील लठ्ठपणा दूर करण्यास मदत होते.

जेव्हा कधीही कुणी किस करतं किंवा आलिंगण देतं, तेव्हा ऑक्सिटोसिन हार्मोनचं प्रमाण वाढतं. सेक्स आणि त्यातील आनंद घेण्याच्या स्थितीत तर ऑक्सिटोसिन हार्मोनचं प्रमाण चांगलंच वाढतं.

वेबसाईट 'बसल डॉट कॉम'च्या रिपोर्टनुसार अहवालात सांगितलंय की, या हार्मोनमुळं पुरुषांमधील लठ्ठपणा कमी होतो. कारण हार्मोनचा परिणाम मेटॅबॉलिझमवर होतो.

हार्मोन कॅलरी आणि भूकेला कमी करतं आणि भूक नियंत्रित ठेवणाऱ्या हार्मोनची पातळीही व्यवस्थित ठेवतं. सेक्स दरम्यान महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक कॅलरी बर्न करतात. तसंच या प्रक्रियेत निघणाऱ्या ऑक्सिटोसिनमुळं पुरुषांना आपल्या वजनावर नियंत्रण मिळविण्यास मदत मिळते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.