नवी दिल्ली : प्रत्येक चौथ्या पुरूषाचे मानणे आहे की त्यांनाही मंथली पिरिअड्सची समस्या जाणवते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. या पुरूषांनुसार महिन्याच्या एका विशिष्ट कालावधीत थकणे, अवस्थता सारख्या समस्यांचा अनुभव होतो. या महिलाप्रमाणे शारिरीक त्रास नाही तर मानसिक त्रासाला समोरे जावे लागते, असे यात नमूद करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात सुमारे अडीच हजार महिला आणि पुरूषांना सामील करण्यात आले. त्यातील २/३ महिलांनी मान्य केले की त्यांच्या पतीला पिरिअड्ससारखी समस्या अनुभवला येते. यातील २० टक्के महिलांनी मानले की त्यांच्या तुलने पतीला अधिक त्रास होतो. महिलांना पिरिअड्समध्ये ज्या प्रकारचा अनुभव येतो तसाच अनुभव २६ टक्के पुरूषांना येत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
सर्वेत समोर आलेल्या माहितीनुसार सुमारे ४३ टक्के महिलांनी सांगितले की पिरिअड़्समध्ये आपल्या साथीदाराची मदत केली आहे. पिरिअड्समध्ये पुरूषांना साधारणपणे पुढील समस्या अनुभवायला येतात.
१) चिडचिडेपणा - ५६ टक्के पुरूषांनी सांगितले
२) इतर दिवसांच्या तुलने अधिक थकणे होते. - ५१ टक्के जणांनी सांगितले.
३) सारखी भूक लागल्याची आभास होणे - ४३ टक्के जणांनी सांगितले.
४) एखाद्या गोष्टी मन लागत नाही - ४३ टक्के जणांनी सांगितले.
५) वजनासंबंधी संवेदनशीलता - १२ टक्के जणांनी सांगितले.
६) शरीरात मुरड येणे - ५ टक्के जणांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.