थंडीमध्ये सर्दी, खोकल्यावर गुणकारी गूळ

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ...पदार्थाचा केवळ गोडवा वाढवण्याचेच काम गूळ करत नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठीही गूळ फायदेशीर आहे. थंडीमध्ये गूळ मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. गुळामध्ये असलेले लाभदायक गुण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे.

Updated: Nov 20, 2015, 11:18 AM IST
थंडीमध्ये सर्दी, खोकल्यावर गुणकारी गूळ title=

नवी दिल्ली : प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ...पदार्थाचा केवळ गोडवा वाढवण्याचेच काम गूळ करत नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठीही गूळ फायदेशीर आहे. थंडीमध्ये गूळ मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. गुळामध्ये असलेले लाभदायक गुण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. 

गुळाचे  हे आहेत फायदे जे तुमचे स्वास्थ्य निरोगी राखू शकतात.

गुळामध्ये मॅग्नेशियमचे अधिक प्रमाण असते. तसेच गूळ हा पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ खाल्ल्यास फायदेशीर ठरतो. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ गुणकारी आहे.

पोटाच्या समस्यांवर गूळ अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. पोटांच्या सर्व समस्यांवर गूळ मात करतो. पोटात गॅस होणे, पचनक्रिया सुधारण्यासाठी गूळाचा फायदा होतो. पचनाचा त्रास असेल तर जेवणानंतर गूळ अवश्य खावा. 

थंडीमध्ये सर्दी, खोकला, तसेच कफासारख्या आजारांवर मात करण्यासाठी गूळ अत्यंत गुणकारी आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.