वाढत्या वयानुसार वाढते 'कामेच्छा', 'साठी'नंतर बुद्धी..

६० वर्षांपेक्षा अधिक वयांच्या वयस्कर व्यक्तींमध्ये यौन संबंध ठेवण्यास अधिक इच्छूक असतात.

Updated: Jan 7, 2016, 05:49 PM IST
वाढत्या वयानुसार वाढते 'कामेच्छा', 'साठी'नंतर बुद्धी..  title=

न्यू यॉर्क :  ६० वर्षांपेक्षा अधिक वयांच्या वयस्कर व्यक्तींमध्ये यौन संबंध ठेवण्यास अधिक इच्छूक असतात. नुकतेच या संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. 

या अभ्यासाचे प्रमुख डॉ. क्रिस्टीन मिलरोड यांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार ६० ते ८४ वर्षांतील वयस्कर व्यक्तींचे वय जसजसे वाढते तसंतसे त्याची सेक्सची इच्छा वाढते. 

अनेकवेळा यौन संबंध बनविण्यासाठी ते पैसे खर्च करतात. काही वेळा ते पेड पार्टनरसोबत असुरक्षित यौन संबंध निर्माण करण्यात इच्छुक असतात. 

मिलरोड यांच्यानुसार, सामान्यपणे अशी धारणा असते की वयस्क व्यक्तींची यौन संबंध बनिविण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे पैसे खर्च करून ते संबंध बनविण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही. पण हे खरं नाही. 

युवकांपेक्षा वयस्क व्यक्ती आपल्या पेड-पार्टनरसोबत यौन संबंध निर्माण करताना सावधानता बाळगत नाहीत. डॉ. क्रिस्टिन मिलरोड आणि पोर्टलँड विद्यापीठाच्या समाजशास्त्राचे प्रोफेसर मार्टिन मोंटो यांनी ६० ते ८४ वर्षांच्या आतील २०८ वयस्क व्यक्तींचे सर्वेक्षण केले, हे सर्व पैसे देऊन सेक्स करतात. 

या सर्वेक्षणात समोर आले की, ६० वर्षांपेक्षा अधिक असलेल्या व्यक्ती सेक्स संबंध बनविण्यात इच्छूक असतात. अभ्यासात आढळले की ५९.२ टक्के वयस्क व्यक्ती नेहमी सेक्स करताना कंडोम वापरणे गरजेचे नाही. तर ९५ टक्के वयस्क व्यक्ती हस्तमैथून करताना सुरक्षा नाही बाळगत. तर ९१ टक्के व्यक्ती मुखमैथून करताना सुरक्षा गरजेची नाही मानत. ३१.१ टक्के वयस्क व्यक्तींनी सांगितले की यापूर्नवी त्यांना यौन संक्रमण झाले होते. तर २९.२ टक्के लोकांनी सांगितले की ते आपल्या आवडत्या पेड पार्टनरसोबत वारंवार सेक्स करतात. 

मिलरोड आणि मोंटो यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांना सांगितले की, संक्रमण संबंधीत आजारांबद्दल इलाज करताना वयस्क व्यक्तींना त्याच्या सेक्स पार्टनरबद्दल जरूर विचारा. त्यांच्याकडे ते पेड पार्टनरसोबत सेक्स करू शकत नाही असा विचार करू नका.