'मायग्रेन' जडण्या मागची कारणं आणि उपाय!

ऑफिसच्या कामामुळं तणाव वाढतो... त्यामुळं नकळत अर्धशिशीचा (मायग्रेन) विकार जडतो. हा विकार जडण्यामागे आणखीही बरीच कारणं असली तरी तो गंभीर आहे हे मात्र नक्की... मात्र काही घरगुती उपायांनी हा विकार हमखास दूर करता येतो. 

Updated: May 25, 2015, 12:50 PM IST
'मायग्रेन' जडण्या मागची कारणं आणि उपाय!

मुंबई: ऑफिसच्या कामामुळं तणाव वाढतो... त्यामुळं नकळत अर्धशिशीचा (मायग्रेन) विकार जडतो. हा विकार जडण्यामागे आणखीही बरीच कारणं असली तरी तो गंभीर आहे हे मात्र नक्की... मात्र काही घरगुती उपायांनी हा विकार हमखास दूर करता येतो. 

आपल्या रोजच्या जेवणात खाद्यपदार्थांना चव यावी यासाठी वापरल्या जाणार्‍या मिठानं अर्धशिशीवर चांगलाच फायदा होतो. हा विकार असणार्‍यांनी ताबडतोब एक ग्लास ताज्या लिंबाचा रस किंवा लेमोनेड प्यायला हवं. या रसात मीठ मात्र घालावंच लागेल. कारण अर्धशिशीवर खरा इलाज मिठानंच होतो. आणखी एक सोपा इलाज म्हणजे लिंबू कापून त्याचा अर्धा भाग कपाळावर चोळल्यास अर्धशिशी पळालीच म्हणून समजा.

शरीरातील सोडियमचं (म्हणजेच मिठाचे) प्रमाण कमी झाल्यामुळेच अर्धशिशी सुरू होते. त्यामुळं ते प्रमाण वाढवणं हाच रामबाण उपाय ठरतो. रोज वापरल्या जाणार्‍या मिठापेक्षा उपचारासाठी सैंधव मीठ वापरणं जास्त चांगलं. कारण त्यामुळं तत्काळ फायदा होतो. सैंधव मिठामुळं डोकेदुखी लगेच थांबतेच, पण ते खाल्ल्यानं रोगप्रतिकार शक्तीही वाढते. शिवाय या खास प्रकारच्या मिठामुळं शरीरात सेरोटोनिन नावाच्या हार्मोन्सचा चांगला विकास होतो. ज्यामुळं शरीराला चांगली ऊर्जा मिळते. नेहमीच्या वापरातील मीठही घेत राहिल्यास शरीरात अल्काईन आणि इलेक्ट्रोलाइट्स वाढण्यास चांगली मदत होते. या दोन्ही रसायनांमुळं शरीराचं सर्वच काम सुरळीत पार पडतं. त्यामुळं यापुढं अर्धशिशी सुरू झाली की लगेच मीठ आणि लिंबू पिळलेलं पाणी प्यायला विसरू नका.

अर्धशिशी हा विकार आठवड्यातून किमान दोनदा तरी बळावतोच. ज्यांच्या घराण्यात पूर्वीपासून हा विकार चालत आला असेल त्यांनाच प्रामुख्यानं तो होतो. कपाळाच्या अर्ध्या भागात ठराविक वेळ तीव्रतेनं दुखतं. हा विकार चक्कर, उलटी, थकावट अशा काही विशिष्ट आजारांना निमंत्रण देतो, त्यामुळं त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. डोकेदुखी सुरू झाली की गोळ्या घेऊन ती थांबवण्याकडे कल असतो. मात्र काही खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळेही अर्धशिशी थांबवता येते. पुरेशी झोप हा या विकारावर जालीम उपाय आहे.

यामुळेही अर्धशिशी पळते

- ताज्या आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्निशियम मोठ्या प्रमाणावर असते. हे रसायन अर्धशिशीसारखा विकार चुटकीसरशी घालवतात. गव्हामध्येही मॅग्निशियम असते. हा विकार झालेल्यांनी आहारात जास्तीतजास्त गव्हाचा वापर करायला हवा.
- जेवणात मासे असणे चांगले. कारण त्यात ओमेगा-३ हे फॅटी अॅसिड आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अर्धशिशीमुळे होणारा त्रास मासे खाण्यामुळे बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
- साय नसलेले दूध प्यायल्यानेही किंवा दुधापासून बनविलेले कोणतेही पदार्थ खाल्ल्याने या विकारावर चांगला फायदा होतो. दुधात व्हिटॅमिन-बी भरपूर असते. त्याला रायबोफ्लेविन असंही म्हटलं जातं. शरीरातील पेशींना ते ऊर्जा देण्याचं काम करतात. पेशींना ऊर्जा मिळाली नाही की अर्धशिशी होऊ शकते.
- अर्धशिशी सुरू झाली की लगेच गरगमागरम कॉफी प्यायलाच हवी. कॉफीमधील रसायनामुळे हा विकार नाहीसा होतो.
- बाजरीमध्ये फायबर, अॅन्टीऑक्सिडंट आणि मिनरल असतात. त्यामुळे या विकारावर बाजरी आहारात असणेही गरजेचे आहे.
- आलं खाल्ल्यामुळेही अर्धशिशी पळून जाते. आहारात आल्याचा वापर करायलाच हवा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.