www.24taas.com, झी मीडिया, कॉवेन्ट्री (इंग्लंड)
पैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो? नाही, असंच आपलं पहिल्यांदा उत्तर असेल... होय ना? पण, आपलं हे मत बदलण्यास एका नवीन संशोधनानं भाग पाडलंय.
दारिद्र्य आलं तर त्याचा सरळ परिणाम तुमच्या मेंदूवर होतो... अगोदरपेक्षा तुमचा मेंदू काम करण्यात मंद होतो. तार्किक क्षमतेत घट होते आणि मानसिक संतुलन बिघडायला लागतं. एका ताज्या अध्ययनात हाच निष्कर्ष समोर आलाय.
नव्या अहवालानुसार, रुपयांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेमुळेही काही जणांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत घट होऊ शकते. तसंच अशा व्यक्तींच्या आयक्यूमध्ये अचानक खूप मोठी घटही दिसून येते. जवळजवळ १३ अंकांपर्यंत ही घट होऊ शकते.
इंग्लंडच्या कॉवेन्ट्री स्थित वार्विक विश्वविद्यालयाचे अर्थतज्ज्ञ आनंदी मणि आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलंय. ज्याप्रमाणे रात्री पुरेशी झोप झाली नाही तर तुमच्या चेतना क्षमतेत घट होते त्याप्रमाणेच आर्थिक विवंचनेत वाढ झाली असता तार्किक क्षमतेत जबरदस्त घट होते. आर्थिक लाभ मिळाल्यानंतर गरिब व्यक्ती त्याच परीक्षांमध्ये अधिक चांगलं प्रदर्शन दाखवतात. संशोधनकर्त्यांच्या निष्कर्षानुसार, पैशांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीची विचारशक्ती कमी होते. यामुळेच गरीब लोक अधिक बचत का करतात आणि अशी लोक इतरांकडून उधार का घेतात, याबाबतीची कारणंही जाणून घेता येतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.