तुम्ही माऊथवॉश वापरता का?

अनेकदा आपण अशी उत्पादने वापरतो जी आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात. यात माउथवॉश, डिटर्जंट, टूथपेस्ट आदींचा समावेश होऊ शकतो.

Updated: Jan 17, 2016, 02:37 PM IST
तुम्ही माऊथवॉश वापरता का? title=

मुंबई : अनेकदा आपण अशी उत्पादने वापरतो जी आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात. यात माउथवॉश, डिटर्जंट, टूथपेस्ट आदींचा समावेश होऊ शकतो.

तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी माऊथवॉश वापरतात. मात्र वारंवार याचा वापर शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो. याच्या अधिक वापरामुळे कॅन्सरची भितीही वाढते. केमिकलयुक्त माऊथवॉश वापरण्याऐवजी घरगुती माऊथवॉशचा वापर करा. यामुळे काही साईडइफेक्ट होणार नाही. 

युनिर्व्हसिटी ऑफ ग्लासगो डेंटल स्कूलच्या संशोधनानुसार दिवसातून तीन वेळा माऊथवॉशचा वापर करणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका वाढू शकतो. या माऊथवॉशने अधिक वेळा गुळण्या केल्याने तोंड तसेच घश्याचा कॅन्सर होण्याची भिती असते.