याला पर्याय नाही, पाच मेडिकल टेस्ट तुम्ही रेग्युलर करायला हव्या

 तुम्ही मेडिकल टेस्ट टाळतात का... तुम्हांला आम्ही पकडलंय... यासाठी कोणालाही दोषी धरलं जात नाही पण आपण डॉक्टरांपासून दूर पळतो हे नक्की आहे. 

Updated: Oct 5, 2016, 08:00 PM IST
याला पर्याय नाही, पाच मेडिकल टेस्ट तुम्ही रेग्युलर करायला हव्या title=

नवी दिल्ली :  तुम्ही मेडिकल टेस्ट टाळतात का... तुम्हांला आम्ही पकडलंय... यासाठी कोणालाही दोषी धरलं जात नाही पण आपण डॉक्टरांपासून दूर पळतो हे नक्की आहे. 

अखेरच्या क्षणी टेस्ट करणे हे अपेक्षीत नाही आहे. नियमित चेकअप करून डॉक्टरांना ठरवू द्या की तुम्हांला काय प्रॉब्लेम आहे.  प्रतिबंध हा रोग बरा करण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. 

तुमच्याकडे कारण असेल की तुमच्याकडे चेकअप करण्यासाठी वेळ नाही. पण सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये तुम्हांला अनेक आजार जडण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे तुम्हांला काही बेसिक टेस्ट दरवर्षी करणे गरजेचे आहे. अनेकांना हापरटेन्शन, डायबिटिज आणि इतर आजार हे झाल्यानंतर कळतात.  त्यामुळे दरवर्षी टेस्ट केल्यास असे आजार होण्यापासून तुम्ही टाळू शकतात. 

१) त्वचेची चाचणी 

डर्मिटोलोजिस्ट तुमच्या त्वचेची चाचणी करतात. त्यात डोक्याच्या, जननांग आणि काही छोट्या जागांवरील त्वचाची चाचणी केली जाते. त्वचेवर मोल्स (मॉस) किंवा काही विकृती असल्यास त्याचा छडा लागू शकतो. महिलांमध्ये त्वचेच्या कॅन्सरची शक्यता असते. 

२) स्तनाग्र डाग

 
महिलांच्या स्तनावर डाग येऊ शकतो. याची शक्यता पुरूषांपेक्षा अधिक स्त्रियामध्ये असते. यात स्तनाला खाज येणे, डिस्चार्ज होणे. यासाठी एका छोट्या ब्रश द्वारे त्याभागातील स्कीन घेतली जाते त्यांची चाचणी केली जाते. 

३) एसटीडी टेस्ट 

तुम्ही सेक्सुअली अॅक्टीव असाल तर ही टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. सेक्सुअल ट्रामिटेड डिसिज होऊ नये यासाठी रक्त, लघवी आणि इतर अंगाची चाचणी केली जाते. त्यामुळे एचआयव्ही यासारखे आजा होऊ शकतात. 

४) मध्यवयानंतरची  टेस्ट 

मध्यमवयानंतर स्तनाचा कॅन्सर हा महिलांमध्ये होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महिलांनी ४० वयात पहिली टेस्ट करणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबात अशा प्रकारे आजाराचा इतिहास असेल तर ही चाचणी यापूर्वीच करावी. 

५) कोलेस्ट्रॉल

तुम्ही हेल्दी खात असाल तरी कॉलेस्ट्रॉल चेक करणे गरजेचे आहे. त्यासाठी लिपीड प्रोफाइल टेस्ट करण्यास सांगितले जाते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास हार्ट डिसिज आणि स्ट्रोक सारखे आजार होऊ शकतात.