ह्रदयविकाराची ‘सायंटिफिक’ भविष्यवाणी

एकदा ह्रदयविकाराचा झटका बसल्यानंर रुग्ण नेहमीच एका भीतीच्या सावटाखाली जगताना दिसतात. दुसरा तीव्र झटका बसेल याची भीती त्याच्या प्रत्येक हाचलाचींमध्ये दिसून येते. परंतु, अशा रुग्णांना आता ‘एसटी-2 टेस्ट’ची मदत होणार आहे. या टेस्टमुळे रुग्णांना ह्रदयविकाराचा धक्का कधी बसेल हे अगोदरच कळू शकेल. या टेस्टद्वारे सध्याचं ह्रद्याच्या स्थितीची माहिती कळू शकेल.  

Updated: Sep 23, 2014, 10:21 PM IST
ह्रदयविकाराची ‘सायंटिफिक’ भविष्यवाणी title=

भोपाळ : एकदा ह्रदयविकाराचा झटका बसल्यानंर रुग्ण नेहमीच एका भीतीच्या सावटाखाली जगताना दिसतात. दुसरा तीव्र झटका बसेल याची भीती त्याच्या प्रत्येक हाचलाचींमध्ये दिसून येते. परंतु, अशा रुग्णांना आता ‘एसटी-2 टेस्ट’ची मदत होणार आहे. या टेस्टमुळे रुग्णांना ह्रदयविकाराचा धक्का कधी बसेल हे अगोदरच कळू शकेल. या टेस्टद्वारे सध्याचं ह्रद्याच्या स्थितीची माहिती कळू शकेल.  

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही पहिलीच टेस्ट आहे जी हार्टअटॅकची योग्य भविष्यवाणी करू शकेल. नवी दिल्लीच्या एका खाजगी डायग्नोसिस सेंटरमध्ये ही टेस्ट नुकतीच सुरु करण्यात आलीय. लॅबोरेटरीच्या व्यवस्थापनानुसार, या टेस्टच्या परिणामांवर तुम्हाला तत्काळ उपचाराची गरज आहे किंवा नाही... तसचं तुम्ही सामान्य जीवन जगू शकता की नाही... हे समजू शकेल.

जागतिक स्वास्थ्य संघटनेनंही या टेस्टला मान्यता दिलीय. ही टेस्ट सर्वात आधी दिल्लीत सुरू करण्यात आलीय. 

कशी होते ही टेस्ट
‘एसटी-2 टेस्ट’ डेंग्यूसाठी केल्या जाणाऱ्या प्लाज्मा आणि सीरम टेस्टसारखीच असते. यामध्ये अँन्टीबॉडी कोटेटमध्ये रुग्णाच्या रक्तातून वेगळे काढण्यात आलेले प्लाज्मा आणि सीरम यांना एकत्रित करून काही वेळेसाठी ठेवण्यात येतं. यामध्ये होणाऱ्या रिअॅक्शनच्या गतीची नोंद केली जाते. नॉर्मल टेस्टप्रमाणे याही टेस्टसाठी रुग्णाच्या थोड्याच रक्ताची गरज भासते.

का आहे ही टेस्ट गरजेची...
कार्डिओलॉजिस्ट डॉ. जीसी गौतम यांच्या म्हणण्यनुसार हार्ट अटॅकमध्ये डॉक्टरांना एन्जिओग्राफीद्वारे केवळ हार्ट ब्लॉकेजची सध्याच्या स्थितीची माहिती मिळते. परंतु, भविष्यात हार्ट अटॅकची शक्यता किती आहे, याचा मात्र कोणताही अंदाज याद्वारे मिळत नाही. या टेस्टमधून ही माहिती समजू शकेल आणि हार्ट अटॅक रोखण्यासाठी वेळही मिळू शकेल. 

टेस्टसाठी केवळ 1,600 रुपये
या टेस्टद्वारे भविष्यात उद्भवणाऱ्या हार्ट अटॅकची शक्यता जवळपास 20 टक्क्यांनी कमी केली जाऊ शकते. या टेस्टसाठी रुग्णाला केवळ 1,600 रुपये खर्च करावे लागतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.