मुंबई : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फणस उपयुक्त फळ आहे. फणसला बाहेरुन काटे असले तरी आत मधुर गोड गरे असतात. हेच गरे डायबेटीस झालेल्यांसाठी चांगले असतात. कारण गऱ्यांमध्ये साखरेचे प्रमाण नसल्याने त्याचा परिणाम होत नाही.
- कच्च्या फणसाची भाजी देखील केली जाते. एक कप कच्च्या फणसाच्या रसात साधारण १५५ कॅलरीज आढळत असल्याचे अभ्यासक सांगतात.
- फणसामध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असून, कोलेस्ट्रॉल आणि चरबीवर नियंत्रण मिळते.
- फणसातून आपल्याला ११ टक्क्यांपर्यंत फायबर मिळते.
-आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्त्व ए, सी, रायबोफ्लेव्हिन, निअँसिन, थायमिन आणि फोलेट हे घटक फणसात आहेत.
- फणसामध्ये आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॉपर, झिंक आणि सेलेनियम ही खनिजे मिळतात.
- फणसातील पोषणद्रव्यांमध्ये कर्करोग विरोधी, क्षरण विरोधी आणि अल्सर विरोधी घटक असतात. त्यामुळ रोगांवर फणस गुणकारी ठरतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.