नवी दिल्ली : समृद्ध घरातील मुलांच्या तुलनेत गरीब मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनातून आढळले आहे. युनिर्व्हसिटी कॉलेज लंडनचे वरिष्ठ लेखक युवान केली यांनी केलेल्या निरीक्षणातून ही माहिती समोर आलीय.
मुलांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. शास्त्रज्ञांनी युकेतील तब्बल २० हजार कुटुंबांचे निरीक्षण केले. या अध्ययनात पहिल्यांदा पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे परीक्षण करण्यात आले.
त्यानंतर ११ वर्षांच्या मुलांचे परीक्षण कऱण्यात आले. यावेळी समृद्ध कुटुंबातील मुलांपेक्षा गरीब घरातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.