तुमचा डोळा का लवतो ? काय आहेत त्याची कारणं

डोळा लवणे म्हणजे शकून किंवा अपशकून असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. पण डोळा लवणे हे तसं फारच त्रासदायक असतं. डोळ्यांमधला मज्जातंतू किंवा स्नायू हलायला लागल्यामुळे तुमचा डोळा लवायला सुरुवात होते. 

Updated: Feb 21, 2016, 09:59 AM IST
तुमचा डोळा का लवतो ? काय आहेत त्याची कारणं title=

मुंबई: डोळा लवणे म्हणजे शकून किंवा अपशकून असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. पण डोळा लवणे हे तसं फारच त्रासदायक असतं. डोळ्यांमधला मज्जातंतू किंवा स्नायू हलायला लागल्यामुळे तुमचा डोळा लवायला सुरुवात होते. 

डोळे लवण्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. पण बऱ्याच वेळा तुमचा डोळा हा लवतो त्याला म्योकिमिया म्हणतात. यामध्ये फक्त एकाच डोळ्याची पापणी फडफडते, आणि काही वेळानंतर आपोआप तुमचा डोळा व्यवस्थित होतो. शरिरातले इतर स्नायू नियंत्रणाबाहेर गेल्यावर जसं होतं, तसंच डोळ्यांच्या बाबतही होतं, आणि डोळा लवायला लागतो. डॉक्टरांच्या मते हा प्रकार काही गंभीर नाही. 

पण ब्लेफारोस्पास्म हा प्रकार मात्र गंभीर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. डोळ्याच्या दोन्ही पापण्या जास्तच जोरात फडफडत असतील आणि हा प्रकार वाढतच असेल तर तुमचे डोळे जायची शक्यता आहे. त्यामुळे लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा आणि उपचार घ्या. 

काय आहेत डोळे लवण्याची कारणं ?

1) ताण: कामाच्या जास्त ताण हे डोळे लवण्याचं मुख्य कारण असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

2)  कमी झोप: रात्रीची झोप कमी झाली तरीही डोळे लवण्याचं प्रमाण वाढू शकतं. कामाच्या वेळी लक्ष केंद्रीत करताना डोळ्यांचा वापर जास्त होतो. त्यातच झोप कमी झाली असेल तर पापणी फडफडते. 

3) कॅफेन: कॅफेन म्हणजेच चहा आणि कॉफीमध्ये असलेली उत्तेजक द्रव्य. तुम्ही चहा आणि कॉफीचं जास्त सेवन करत असाल तर शरीरात कॅफेनचं प्रमाण वाढत आणि कॅफेनमुळेही डोळे लवण्याचा त्रास होतो.