मुंबई : लठ्ठपणा हा अनेक आजारांना आमंत्रण देणारा एक विकार आहे. लठ्ठपणापासून सूटका होणे तसं तर खूप अवघड आहे पण अशक्य नाही. काही गोष्टी नियमित केल्याने तुम्ही लठ्ठपणावर नियंत्रण मिळवू शकता.
१. बेक फूड : ७ दिवसांमध्ये बेक फूड खाणं टाळा. केक, कुकीज, ब्रेड यासारख्या गोष्टी टाळा. गोड पदार्थ खाणं ही टाळा. गोड खाण्याचं मन झाल्यास फक्त फळ खा.
२. तळलेले पदार्थ : तळलेल्या पदार्थामध्ये मीठाचं आणि कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे मासे किंवा इतर कोणतंही तळलेलं मांस खाऊ नका. भज्जी, बटाट्याचे चिप्स यासारखे पदार्थ खाणं टाळा.
३. ड्रिंक्स : ड्रिंक्समध्ये कॅलरीजचं प्रमाण अधिक असतं. बीयर, अल्कोहोल, गोड चहा, फ्लेवर्ड कॉफी, फ्लेवर्ड पाणी, विटामिन पाणी, सोडा या गोष्टी घेणं टाळा. साधं पाणी मात्र भरपूर प्रमाणात प्या.
४. कामे : ७ दिवसांमध्ये तुम्ही कामं करण्यासाठी मेहनत घ्या. मेहनतीची कामं करा. शरीराची हालचाल मोठ्या प्रमाणात झाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
५. चालणे : वजन कमी करण्यासाठी रोज कमीत कमी १० हजार पाऊलं चालणे आवश्यक आहे. पायी चालणे, जॉगिंगला जाणे आणि कसरत करणे सुरू करा.
या 5 गोष्टी लक्षात घेऊन नियमित केल्याने तुमचं वजन कमी होईल. पण त्या तुम्ही नियमित केल्या पाहिजे. शरीरातील चरबी वाढू नये यासाठी काही गोष्टी खाणं टाळल्या पाहिजे.