'टीबी भगाओ, जिंदगी बढाओ', रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम

'रोटरी क्लब' या संस्थेकडून विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलीय. रविवारी, १३ सप्टेंबर २०१५ रोजी नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळणार आहे. 

Updated: Sep 11, 2015, 10:53 PM IST

मुंबई : 'रोटरी क्लब' या संस्थेकडून विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलीय. रविवारी, १३ सप्टेंबर २०१५ रोजी नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळणार आहे. 

'टीबी भगाओ, जिंदगी बढाओ' असं म्हणत रोटरी क्लबनं मंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात जवळपास १५० ठिकाणी ही आरोग्य शिबीरं आयोजित केली आहेत. 

डिजीटल एक्सरे वापरून टीबीची लक्षणं दिसून येणाऱ्या रुग्णांची यावेळी तपासणी केली जाईल. टीबीची लक्षणे आढळली तर रुग्णांना मोफत उपचार आणि मार्गदर्शन संस्थेकडूनच देण्यात येणार आहे. 

हे शिबीर यशस्वीरित्या पार पडल्यानंतर अशीच सुविधा पुन्हा २९ नोव्हेंबर, २४ जाने आणि २७ मार्च रोजीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये 'टीबी'संबंधी जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.