नवी दिल्ली : तरुण युवकांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक वाढत चाललेय. प्रत्येक वर्षी धूम्रपान न करणाऱ्या स्त्रियाही फुफ्फुसाच्या कॅन्सरने मरतात. मात्र हेल्थी डाएट केल्यास तुम्ही या कॅन्सरचा धोका कमी करु शकतात.
सफरचंद - सफरचंदात फ्लॅवेनॉईड्सचे प्रमाण असल्याने रोज सफरचंद खाल्ल्यास फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.
लसूण - लसणामध्ये डायलिल सल्फाईड असते. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. कच्चा लसूण खाल्ल्याने याचा फायदा अधिक होतो.
ब्रोकोली - ब्रोकोली सर्वाधिक फायद्याची भाजी आहे. ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्याने फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.
लाल सिमला मिरची - लाल सिमला मिरचीतील फायटोकेमिकल फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करते.
पालक - पालकात मोठ्या प्रमाणत फोलेट, व्हिटॅमिन ए तसेच ल्यूटिन असले ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.