नरम प्लास्टिकच्या वस्तूही घटवू शकतात शुक्राणुंची कार्यक्षमता!

वॉलपेपर, सँडल, नेल पॉलिश, परफ्यूम आणि गालिच्यांमध्ये आढळणारे रसायन पुरुषांच्या शुक्राणुंची गतिशीलता कमी करू शकतात ज्यामुळे त्यांच्या प्रजाननामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

Updated: Sep 25, 2015, 04:22 PM IST
नरम प्लास्टिकच्या वस्तूही घटवू शकतात शुक्राणुंची कार्यक्षमता! title=

लंडन : वॉलपेपर, सँडल, नेल पॉलिश, परफ्यूम आणि गालिच्यांमध्ये आढळणारे रसायन पुरुषांच्या शुक्राणुंची गतिशीलता कमी करू शकतात ज्यामुळे त्यांच्या प्रजाननामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

एका नव्या अभ्यासानुसार, थलेटस रसायनी वॉलपेपर, सँडल, नेल पॉलिश, परफ्यूम आणि गालिच्यांमध्ये आढळणारे रसायन थलिक अम्लांच्या तत्वांचा एक समूह आहे. यातील काही तत्व अंत:स्रावी ग्रंथिंवर प्रतिकूल परिणाम टाकू शकतात.

आपण दररोज सहज हाताळणाऱ्या गोष्टींमध्ये असणारं नरम प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये अनेक थलेटस् आढळतात. थलेट्सचे अणु प्लास्टिकमधून बाहेर पडतात आणि हेच अणु खाण्या-पिण्याच्या पदार्थांमार्फत, त्वचेच्या संपर्कात येऊन किंवा श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात सहज प्रवेश मिळवतात. या पदार्थांचा शरीरात असलेल्या स्तर साधारण लघवीच्या चाचणीद्वारेही समजू शकतो. 

लुंड युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळा मेडिसन विभागाचे शोधकर्ता जोनॅटन एक्सेल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या रसायनांचा स्तर जाणून घेण्यासाठी लघवीतील थलेटस् डीईएचपी (डाई-इथाईल हेक्साइल थेलट्स)च्या चयापचय स्तर (मेटाबोलाईट लेव्हल) चा अभ्यास केला. सोबतच 18-20 वयाच्या जवळपास 300 तरुणांच्या शुक्राणुंच्या गुणवत्तेचाही अभ्यास केला. यावेळी, पुरुषांमध्ये जेवढं जास्त चयापचय स्तर होता, तेवढाच त्यांच्या शुक्राणुंची गतिशीलता तेव्हढीच कमी आढळली, असं त्यांनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.