मुंबई : शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, सतत थकवा जाणवतो. अशा आणि विविध समस्या तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे. मात्र, रक्त वाढविण्यासाठी उपाय केले पाहिजेत. त्याच्यावर आधारित काही टीप्स...
१. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.
२. एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा.
३. सफरचंदाच्या ज्युसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते. किंवा नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
४. रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा.
५. चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.
६. दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
७. तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.
८. दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.
९. मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.
१०. टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.
या सर्व घरगुती टीप्सचा वापर केल्यास तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल आणि तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहाल.