मुंबई : सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी स्त्रीया महागड्या क्रीम्सचा वापर करतात. पार्लरमध्ये वेळ आणि पैसा दोंन्ही गोष्टी वाया घालवतात.
सुंदर दिसण्यासाठी तुम्ही घरच्याघरीच उपाय करु शकता. भाजीची चव वाढवणाऱ्या टोमॅटो आणि बटाट्याने तुम्ही सुंदर दिसू शकता.
टोमॅटो आणि बटाट्याचा सुंदर दिसण्यासाठी फायदा :
टोमॅटो :
१. दररोज एक टोमॅटो खाल्ल्याने चेहरा चमकदार होतो.
२. टोमॅटोचा रस नियमित 20 मिनिटं चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते.
३. तेलकट त्वचा असलेल्या स्त्रीयांनी टोमॅटोच्या रसात थोडं मध टाकून चेहऱ्यावर लावावा.
बटाटा :
१.बटाट्याने चेहऱ्यावरचे काळे डाग जाण्यास मदत होते.
२. रोज बटाट्याचा एक तुकडा चेहऱ्यावर 5 मिनिटं घासल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग जातात.
३. बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो.