मुंबई: औषधं प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपलं शरीर आणि तब्येतीवर होतात. तसंच प्रमाणापेक्षा जास्त व्यायामही शरीराला हानिकारक ठरू शकतो. एका संशोधनामध्ये ही गोष्ट समोर आली आहे.
प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे कार्डिओ आणि हृदयाच्या समस्या निर्माण होतात. ऑस्ट्रेलियाच्या बेकर आयडीआय हार्ट अँड डायबिटिक इन्स्टिट्यूटनं याबाबतचं संशोधन केलं आहे.
मीडियातून व्यायाम आणि त्याच्या फायद्याबद्दल वाढवून सांगतिलं जातं, अशी प्रतिक्रिया संशोधनकर्त्यांनी दिली आहे. तसंच अती व्यायामावर भाष्य केली, तरी आमच्यावर टीका होते, अशी खंतही संशोधनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
संशोधनकर्त्यांनी केलेलं हे संशोधन आता कॅनडियन जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.