लंडन : नवे कपडे बनवतांना त्यात मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर होतो, यातील काही केमिकल्स हे विषारी असू शकतात, आपल्या त्वचेसाठी काही केमिकल्स हानीकारक असतात, कपडे धुतल्यानंतरही या केमिकल्सचा प्रभाव दिसून येतो, स्टोकहोल्म युनिवर्सिटीच्या एका शोधात ही बाब पुढे आली आहे.
कपड्यांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक घातक केमिकल्स या शोधात दिसून आले आहेत. जैविक कापसापासून बनवण्यात आलेल्या कपड्यांमध्येही विषारी तत्व असू शकतात, मात्र हे प्रमाण फारच कमी असेल असंही सांगण्यात येतंय.
स्वीडीश आणि आंतरराष्ट्रीय क्लॉथिंक चेनने साठ कपड्यांचं सॅम्पलची चाचणी केली, यातील प्राथमिक चाचणीत कपड्यांमध्ये हजारो केमिकल्स असल्याचं दिसून आलं.
शोधकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलर्जीशी संबंधित आणि त्वचेशी संबंधित रोगांचा यामुळे धोका वाढणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.