मुंबई : सध्याच्या घडीला मोबाईल ही माणसाची चौथी मुलभूत गरज बनलीये. हल्ली खाण्याशिवाय माणूस एकवेळ राहू शकेल मात्र फोनशिवाय राहणे मुश्किल.
अनेकांना टॉयलेटमध्येही फोन वापरण्याची सवय असते. तुम्हालाही तशी सवय असेल तर लगेच बदला. हे तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. या सवयीमुळे तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देता.
टॉयलेटमध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्यामुळे ईकोलाय, salmonella, c difficile हे बॅक्टेरिया फोनवर जमा होतात. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
तुम्ही टॉयलेटमध्ये फोनचा वापर करत असाल तर अल्कोहोल बेस वाईप्सच्या मदतीने वारंवार फोन स्वच्छ करत राहा.