आता सुट्टीतही तुमचे वजन वाढणार नाही

आपले रुटीन लाईफ हेल्थी राहण्यासाठी आपण विशेष टाईमटेबल बनवतो. मात्र सुट्टी आल्यास हे टाईमटेबल बिघडून जाते. हेल्थी रुटीनवर आपले लक्षही राहत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम वजनावर होतो. या आहेत ५ टिप्स. ज्या तुम्हाला सुट्टीतही तुमचे वजन वाढू देणार नाही. 

Updated: Dec 24, 2015, 03:29 PM IST
आता सुट्टीतही तुमचे वजन वाढणार नाही title=

नवी दिल्ली : आपले रुटीन लाईफ हेल्थी राहण्यासाठी आपण विशेष टाईमटेबल बनवतो. मात्र सुट्टी आल्यास हे टाईमटेबल बिघडून जाते. हेल्थी रुटीनवर आपले लक्षही राहत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम वजनावर होतो. या आहेत ५ टिप्स. ज्या तुम्हाला सुट्टीतही तुमचे वजन वाढू देणार नाही. 

लिहून ठेवा - सुट्टीच्या दिवसांत तुम्ही कॅलरीजनी भरलेले पदार्थ किती खाता याकडे लक्ष नसते आणि ते लक्षातही राहत नाही. यामुळे आपण काय आणि कधी खाल्ले ते लिहून ठेवा. म्हणजेच एखाद्या दिवशी कॅलरीज किती एक्स्ट्रा गेल्यात ते लक्षात येईल. त्यामुळे पुढे खाण्याकडे आपले लक्ष राहील. 

थांबा आणि एन्जॉय करा - वर्षातून एकदाच सुट्ट्या येतात. त्यामुळे सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घ्या. रुटीन बदलून खावेसे वाटल्यास नक्कीच आनंदाने आणि बेफिकीर होऊन खा. 

नियोजनानुसार चाला - हेल्थी लाईफस्टाईलसाठी तुम्ही सुट्ट्यामध्ये जे काही नियोजन केले असेल त्याचे नियमितपणे पालन करा. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसातून प्रत्येकी तीन ते पाच तासांनी खात राहा. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर यादरम्यान मधेमधे खात राहा.

अॅक्टिव्ह राहा - सुट्ट्यामध्ये जरी रुटीन लाईफला थोडा ब्रेक दिला असला तरी व्यायाम मस्ट आहे. यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहील. 

पुरेशी झोप घ्या - उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. व्यस्त लाईफस्टाईलमुळे आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे सुट्टीत पुरेशी झोप घ्या. मात्र अतिझोपही नको हां.