मुंबई : सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने सतत अॅसिडीटी होते. अनेकदा कार्यालयांमध्ये कामाच्या वेळा योग्य नसल्याने योग्य वेळेत खाणे होत नाही. यामुळे अॅसिडीटीचा त्रास होता. हे घरगुती उपाय केल्यास चुटकीसरशी अॅसिडीटी पळून जाईल.
अॅसिडीटी झाल्यास कॉफी घेऊ नका. त्याऐवजी हर्बल टीला प्राधान्य द्या
दररोज एक ग्लास कोमट पाणी प्या
रोजच्या डाएटमध्ये केळी, कलिंगड आणि काकडीचा समावेश करा
अॅसिडीटी झाल्यास नारळपाणी घेणे उत्तम
दररोज एक ग्लास दूध प्या
दोन वेळच्या जेवणादरम्यानची वेळ अधिक असू नये. थोड्या थोड्या वेळाने खात राहा.
लोणची, तिखट चटण्या खाणे टाळा.
पुदिन्याची काही पाने पाण्यात उकळा आणि जेवणानंतर हे पाणी प्या.
अॅसिडीटी झाल्यास लवंगाचा तुकडा चघळा.
गूळ, लिंबू, केळी, बदाम आणि दही हे पदार्थ अॅसिडीटीपासून लगेच सुटका देतात.
मोठ्या प्रमाणात स्मोकिंग तसेच ड्रिंकिंग केल्याने अॅसिडीटी वाढते.