www.24taas.com, वॉशिंग्टन
एड्ससाठी कारणीभूत ठरणाऱ्या पेशी शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश आलंय. त्यामुळे महारोग समजल्या जाणारा ‘एडस्’ टाळण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्म लस तयार करण्यासाठी खूप महत्ताचं योगदान ठरणार आहे.
‘एचएलए-बी 57’ हा एक रोगप्रतिकारक पेशीचा प्रकार आहे जो सामान्यांमध्ये पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात आढळतो. संशोधनकर्त्यांच्या मतानुसार, एचआयव्ही संक्रमण करणाऱ्या टी-कोशिका या एचआयव्ही प्रोटीन आयडब्ल्यू 9वर निशाना साधतात. या पेशींचा शोध लावल्यामुळे आता संशोधकांना एडस् होऊन नये, यासाठीची लस बनविण्यासाठी खूप मोठी मदत मिळणार आहें. रोगप्रतिकारक पेशींवर संशोधन करून अभ्यासक त्यापासून एड्सवर लस तयार करण्यात सध्या हे संशोधक गुंतलेत. या अभ्यासाचे परिणाम जर्नल ऑफ वायरोलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.