वॉशिंग्टन: वैज्ञानिकांनी कँसरग्रस्त रुग्णांसाठी नवी लस विकसित केलीय, जी रुग्णांच्या शरीरात प्रोटीनचं रूप बदलतं आणि यामुळं कँसरशी लढण्यासाठी रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवू शकते. न्यूज एजंसी इएफइनुसार, संशोधनाची मुख्य लेखिका बीट्रिज कारेनोनं सांगितलं, 'कँसरची लस सामान्यरुपात वापरली जावू शकते.'
'ही एक पहिली वैयक्तीक लस आहे. सामान्य लस सामान्य आणि गैर रुपांतरित प्रोटीनवर प्रतिक्रिया करते आणि म्हणून प्रतिकार शक्ती खूप मजबूत होत नाही' कारेनो यांनी सांगितलं, 'आम्ही आपल्या लसीमध्ये रुपांतरीत प्रोटीनचा वापर ट्यूमरसोबत केला आणि सिद्ध केलं की, वेगळ्या ट्यूमरची ओळख करण्याची तीव्रता आणि संख्या वाढून या प्रोटीन्सनी टी पेशींमध्ये मोठी प्रतिक्रिया केली.'
टी-पेशी या इतर पेशींप्रमाणे शरीरातील असामान्य पदार्थांचा शोध घेते आणि समाधान करण्यायोग्य पदार्थांचं उत्पादन करून ते संपवतात. कारेनो यांनी सांगितलं, 'परिवर्तित प्रोटीन्सनं हे सिद्ध केलंय की, त्यांच्यात प्रतिकार शक्ती सक्रिय करण्याची क्षमता जास्त आहे.'
संशोधकांनी सांगितलं की, याप्रकारेच्या लशी मेलेनोमा, आतड्यांचा कँसर, मूत्राशय आणि मलाशयाचा कँसर पीडित रुग्णांसाठी जास्त प्रभावी आहे. सेंट लुईसमधील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूलच्या मेडिसिन विभागात संशोधक कारेनो यांनी सांगितलं, 'आम्हाला मोठ्या संख्येत जे विभाजित आणि परिवर्तित प्रोटीन मिळाले, त्यांचा वापर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केला जावू शकतो.'
(एजंसी इनपुटसह)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.