नवी दिल्ली : भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. थोड्या थोड्या वेळाने खात राहणे चांगले असते मात्र भूक नसताना खाणे आरोग्यासाठी चांगले नव्हे.
शिकागोच्या इलिनोईस युनिर्व्हसिटीतील डेविड गाल यांनी याबाबत ४५ विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले. सुरुवातीला यांच्या भुकेबाबतची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर यांना कार्बोहायड्रेटयुक्त भोजन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या रक्तीतील साखर मोजण्यात आली.
कार्बोहायड्रेटयुक्त भोजन घेतल्यानंतर रक्तात साखरेची पातळी वाढलेली आढळली. भूक लागलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा भूक न लागलेल्या विद्यार्थ्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण अधिक आढळले. रक्तात साखरेचे प्रमाण अचानक वाढल्यास आरोग्यावर परिणाम होतो.
वैज्ञानिकांच्या मते भूक लागल्यानंतर भोजन करावे. यामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते आणि आरोग्यही उत्तम राहते.