उज्जैन: झोपणं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं, मात्र झोपण्यासाठीही एक योग्य वेळ असते. चुकीच्या वेळी झोपनं आरोग्याला चांगलं नसतं.
या आहेत झोपण्याच्या तीन चुकीचा वेळा
सूर्योदयाची वेळ: असं म्हणतात सूर्योदयानंतर खूप वेळ झोपणाऱ्या व्यक्तींवर लक्ष्मीमाता रुष्ट होते. ते कधीच संतुष्ट राहत नाही. त्यांना मानसिक ताण-तणावाचा सामना नेहमीच करावा लागतो. शिवाय त्यांना दीर्घयुष्यापर्यंत निरोगी आरोग्य लाभत नाही.
हे झालं शास्त्राचं म्हणणं मात्र वैज्ञानिक दृष्ट्याही सूर्योदयापूर्वी उठणं चांगलं मानलं गेलंय. पहाटे वातावरणात शुद्ध हवा असते. अशा शुद्ध वातावरणात फिरल्यानं आणि व्यायाम केल्यानं आपलं आरोग्य चांगलं राहतं.
दुपारची वेळ : झोपण्याची दुसरी चुकीची वेळ म्हणजे दुपारी झोपणं. दुपारी झोपल्यानं काम स्वास्थ्याला नुकसान होतं. जे लोक दुपारी झोपतात, त्यानं लठ्ठपणा लवकर वाढतो.
दुपारी झोपल्यानं आपल्या पचनक्रीयेचं तंत्र बिघडू शकतं. जेवण योग्यरित्या न पचल्यानं मग पोटासंबंधी आजार बळावतात. जसे- अॅसिडिटी, गॅसेस, अपचन इत्यादी. दुपारची वेळ ही आपले व्यवहारीक कामं करण्याची असते.
सूर्यास्ताची वेळ : झोपायची तिसरी चुकीची वेळ म्हणजे सूर्यास्ताची वेळ. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी देवी-देवतांचं पूजन करायची वेळ असते. यावेळी झोपणाऱ्यांवर देवाची कृपा दृष्टी नसते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.