हाडं मजबूत करणारे पाहा टॉप 5 सुपरफूड्स!

आपल्या शरीरातील हाडं संपूर्ण शरीराचा भार वाहतात... आपल्या शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचं काम हाडांचं असतं. मात्र वाढत्यावयानुसार आपण हाडांची काळजी घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर योग्य आहार घेणं ज्यानं तुमची हाडं मजबूत राहतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं. 

Updated: Jul 23, 2014, 04:18 PM IST
हाडं मजबूत करणारे पाहा टॉप 5 सुपरफूड्स! title=

मुंबई: आपल्या शरीरातील हाडं संपूर्ण शरीराचा भार वाहतात... आपल्या शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचं काम हाडांचं असतं. मात्र वाढत्यावयानुसार आपण हाडांची काळजी घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर योग्य आहार घेणं ज्यानं तुमची हाडं मजबूत राहतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं. 

हाडं मजबूत ठेवण्यासाठी पाहा कोणते आहे टॉप फाईव्ह सुपरफूड्स: 

दूध: शरीराला कॅल्शियम मिळण्याचा सर्वात बेस्ट उपाय म्हणजे दूध पिणं. दूधामुळं हाडं मजबूत होतात. तज्ज्ञांच्या मते प्रौढांच्या शरीरात कमीतकमी 700 मि. ग्राम कॅल्शियम दिवसाला जायला हवं. तर ऑस्टिओपोरोसिस असलेल्यांच्या शरीरात दरदिवशी कमीतकमी 1,200 मिली ग्राम कॅल्शियम आवश्यक. 

नॅशनल इन्सिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंट (NICHD)च्या मते लो फॅट किंवा फॅट फ्री असलेल्या दूधात खूप प्रमाणात कॅल्शियम असतं. 

कॅल्शियम व्यतिरिक्त दूधात पोटॅशियम, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी, ए आणि बी12 ही असतात, ते सुद्धा हाडांसाठी आवश्यक असतात. 

ज्या व्यक्तींना दूध आवडत नाही त्यांनी दूधजन्य पदार्थ जसे दही, चीज यांचा आहारात समावेश करावा, त्यात सुद्धा कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. 

सार्डिन: कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं, ते म्हणजे छोटा मासा सार्डिन माशात. 

सामन:  सामन नावाचा एक मौल्यवान मासा आहे. ज्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. या छोट्या माशात हाडं मजबूत करणाऱ्या प्रॉपर्टिज आहेत. व्हिटॅमिन डी त्यात असतं जे कॅल्शियम शोषून घेतं. अभ्यासानुसार फिश ऑईल सप्लिमेंट महिलांच्या शरीरातील हाडांची झिज कमी करतं, ज्यामुळं ऑस्टिओपोरोसिसपासून बचावू शकतो. 

हिरव्या पालेभाज्या: गर्द हिरव्या पालेभाज्या जशा पालक, ब्रोकोली हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा मोठा स्त्रोत आहे. शिवाय कोलार्ड्स आणि सलगम कंदातही कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. 

काजू आणि बिया: अक्रोड, पिस्ता सारख्या सुख्यामेव्यात कॅल्शियम भरपूर असतं. सोबतच ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि मिनरल्सही त्यात भरपूर प्रमाणात असतात. शेंगदाणे आणि बदामात पोटॅशियम असतं जे मुत्राद्वारे कॅल्शियम वाया जाण्यापासून वाचवतं. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.