मुंबई : अरे, आज ना मला काहीतरी खावंसं वाटतंय? काहीतरी चटपटा, तिखट, गोड, आंबट किंवा चॉकलेट... असे अनेक पदार्थ कधी आणि कोणाला खावेसे वाटतील सांगता येत नाही... पण, असं अचानक आपल्याला काहीतरी स्पेशल खावंसं का वाटतं? याचा कधी विचार केलात...
'डेली मेल'मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जर आपल्याला काहीतरी स्पेशल खावसं वाटतंय... म्हणजे आपल्या शरीराला नक्कीच एखाद्या पदार्थाची कमतरता भासतेय. आपलं शरीर आपल्याला या सूचना पाठवण्याचं काम करत असतं... त्यामुळे, आपल्या शरीराला किंवा त्वचेसाठी आवश्यक असणारं तत्व मिळालं नाही, की लगेचच आपल्याला काहीतरी स्पेशल खाण्याची इच्छा होते.
- जर आपल्याला गोड खाण्याचं मन होत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या शरीरात क्रोमियमची गरज आहे.
- जर आपल्याला चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर त्याचा अर्थ आहे आपल्या शरीरार सोडियमची कमतरता आहे.
- जर तुम्हाला मीठ किंवा खारट खाण्याची इच्छा होतेय तर तुमच्या शरीरात सोडियमची कमी आहे.
- जर तुम्हाचं मांस खाण्याचं मन होत असेल तर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असते.
- पण, तुम्हाला जर तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाण्याचं मन करत असेल तर तुमच्या पोटात काहीतरी गडबड आहे हे नक्की...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.