बटाटे खाण्याचे हे सहा फायदे तुम्हाला अचंबित करतील...

आपल्या नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात हे तर तुम्ही एव्हाना ऐकलंच असेल... पण, याच बटाट्यांचे हे सहा उपयोग तुम्हाला आश्चर्यचकीत करून टाकतील.

Updated: Oct 15, 2015, 02:49 PM IST
बटाटे खाण्याचे हे सहा फायदे तुम्हाला अचंबित करतील...  title=

मुंबई : आपल्या नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात हे तर तुम्ही एव्हाना ऐकलंच असेल... पण, याच बटाट्यांचे हे सहा उपयोग तुम्हाला आश्चर्यचकीत करून टाकतील.

अधिक वाचा - वजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!

बटाटे खाल्ल्यानं व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे. पण एका अभ्यासानुसार, योग्य पद्धतीनं बटाटे खाल्ल्यास तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी ते मदत करतात. 

अधिक वाचा - टमी कमी करण्यासाठी पाच सोप्या टिप्स!

बटाट्य़ांमध्ये कार्बोहायड्रेट असतात... त्यांमुळे योग्य पद्धतीत आणि योग्य प्रमाणात बटाटे खाणं खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात. 

पाहा, बटाटे कसे ठरतात तुमच्यासाठी उपयोगी... 

- बटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. 

- बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढविण्यासाठीही मदत होते. 

- इतकंच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदय रोगांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतात.

अधिक वाचा - वजन कमी करताय? या गैरसमजांपासून दूर राहा!

- बटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात. 

- तसंच बटाट्यांमधलं व्हिटॅमिन सी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

- बटाट्यांमध्ये असलेलं फ्लॅवोनॉइड अॅन्टिऑक्सिडन्टसं तुम्हाला कॅन्सरपासून दूर ठेवतं... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.