नवी दिल्ली : दारुचे अधिक सेवन हे शरीरास हानिकारक असते. हल्ली सर्रास बऱ्याच ठिकाणी पुरुषांसह स्त्रियाही ड्रिंक करताना आढळतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की महिलांसाठी दारुचे अधिक सेवन पुरुषांच्या तुलनेत अधिक हानिकारक ठरु शकते.
दारुच्या सेवनामुळे महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते. दारु प्यायल्यानंतर अनेक महिला अधिक जेवण जेवतात यामुळे वजनही वाढते.
एका रिसर्चनुसार महिलांमध्ये लिव्हर आणि मेदूंच्या समस्या अधिक आढळतात. यामुळे महिलांना दारुचे सेवन केल्यास शरीरासाठी हानिकारक ठरते. तसेच दारु प्यायल्यानंतर महिलांना लवकर झोप येत नाही.