योगा केल्यानं जीवनात आनंद आणि तणावापासून वाचू शकतो..!

आरोग्य तज्ज्ञांच्यामते, तणाव आणि मानिसक रोग यासारखे आजार दूर  करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्ध देखील  झाले आहे.

Updated: Sep 18, 2014, 08:39 PM IST
योगा केल्यानं जीवनात आनंद आणि तणावापासून वाचू शकतो..! title=

नवी दिल्ली : आरोग्य तज्ज्ञांच्यामते, तणाव आणि मानिसक रोग यासारखे आजार दूर  करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्ध देखील  झाले आहे.

उच्च रक्त दाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगा हा रामबाण उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे, असे सांगण्यात येते. रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक अॅलोपॅथीची औषधं खावेत की योगा करावा  अशा द्विधा मनस्थितीत असतात. पण लोकांना हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे.

लोकांना 70 टक्केपेक्षा जास्त रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण  30 टक्क्यांनी कमी होते., असे अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेच्या फिजिओलॉजीचे जुने  प्रोफेसर रमेश बिजलानी यांनी सांगितले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.