नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं निवासस्थान म्हणजेच '१० जनपथ' हे देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानापेक्षा मोठं असल्याचं समोर आलंय. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान '७ रेसकोर्स रोड' हेदेखील १० जनपथच्या बंगल्यापेक्षा लहान आहे.
माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये ही माहिती समोर आलीय. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचे निवासस्थान मात्र सोनियांच्या बंगल्यापेक्षा मोठे आहेत.
राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि ७ रेसकोर्स रोड हे शासकीय निवासस्थान आहेत. पण, सोनियांचा १० जनपथ स्थित बंगला मात्र त्यांना खासदार म्हणून उपलब्ध करून देण्यात आलाय.
- सोनियांचा हा बंगला जवळपास १५,१८१ स्क्वेअर मीटर क्षेत्रात पसरलेला आहे.
- तर पंतप्रधान मोदींचा बंगला १४,१०१ स्क्वेअर मीटरमध्ये बनलाय.
- उपराष्ट्रपतींचं निवासस्थान (६ मौलाना आझाद रोड) - २६,३३३.४९ स्क्वेअर मीटर
- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी (१२ तुगलक लेन स्थित निवासस्थान) - ५,०२२.५८ स्क्वेअर मीटर
- प्रियांका गांधी - वाड्रा यांचा (३५ लोधी इस्टेट स्थित निवासस्थान) - २,७६५.१८ स्क्वेअर मीटरवर पसरलाय.
दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या संपत्तीविषयी अधिक माहिती देण्यासाठी हिमाचल सरकारनं नकार दिलाय. प्रियांका यांना एसपीजी सुरक्षा दिली गेलीय त्यामुळे, अशी माहिती देणं म्हणजे प्रोटोकॉलचं उल्लंघन करणं असेल, असं कारण यात देण्यात आलंय.